पांगरी (गणेश गोडसे) : वेळ भर दुपारी बाराची. रस्त्यांवर दोन-तिनशे लोकांचा धीरगंभिर, माणसांचा जमाव, हातात काठया दगड घेऊन तयारीत उभा. आता काय करायचे हया एकाच विवंचनेत सर्व जमाव. एरव्ही एखादया घटनेची माहिती मिळाल्यानंतरही घटनास्थळावर उशिरा पोचणारा अशी  पोलिसांची समाजातात ओळख निर्माण होत असताना पांगरी (ता.बार्शी) येथील एका घटनेत पोलिसाने आपल्या कार्यतत्परतेची एक वेगळीच चुणूक दाखवुन अनेकांना आश्‍चर्य केल्‍याची घटना पांगरीत घडली. पोलिसही मदतीला तात्काळ धावुन जाणारीच यंत्रणा असल्याचे यावरुन सिध्‍द होत आहे.
   पांगरी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या व मुळ अक्कलकोट येथील रहिवाशी असलेल्या विरेश कलशेट्टी या धाडसी पोलिस कर्मचा-याने उपस्थित दोन-तिनशेच्या जमावातुन मार्ग काढुन पुढे जावुन पहाण्‍याच्या प्रयत्न केला. तर एकाच्या घरात साप घुसल्याचे त्यांना समजले. कलशेट्टी या कर्मचा-याने आपल्या जिवाची बाजी लावुन साप असलेल्या घरात सरळ प्रवेश करून सापाच्या शेपटीला धरून त्याला खेळवत ते घराबाहेर घेऊन आले व नंतर तो साप त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात सोडुन दिला.
    दुपारी अचानक एकाच्या घरात साप घुसला. घरातील महिला पुरूष व लहान बालकांनी एकच गलका करत साप साप पळा पळा असे म्हणत घरातुन काढता पाय घेतला. कांही काळाने साप घराबाहेर निघेल अशी अशी अपेक्षा धरून ते घराबाहेर उभे राहीले. मात्र साप कांही बाहेर येण्‍याचे नांव घेत नव्हता. घरासमोर तरूणांचा मोठा जमाव, हातात दगड काठया व इतर साहित्य घेऊन सापाला मारण्‍यासाठी उभा होता. पण साप कपाटाखाली जावुन बसलेला असल्यामुळे पुढे जाण्‍यास कोणीही धजावत नव्हते. तशातच एकाने येऊन हा साप देवाचा असल्यामुळे मारणे महापाप ठरेल असे सांगितल्यामुळे उपस्थितांनी आपल्या काठया म्यान केल्या. मात्र आता प्रश्‍न होता की साप घराबाहेर काढायचा कसा. मात्र दरम्यान कलशेट्टी या धाडसी पोलीस तरूणाने आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांकडुन घटनेची माहिती घेऊन कपाटाखालील साप घराबाहेर काढुन निसर्गाच्या सानिध्यात सोडुन दिला व घरमालकांने सुटकेचा निश्‍वास सोडला. आपल्या जिवावर उदार होऊन व प्राणाची बाजी लावुन साप घराबाहेर काढल्याबदल कलशेटी यांचे सर्वस्तरांमधुन अभिनंदन होत आहे. तसेच त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेबदल घरमालकांनी त्यांचे आभार मानले.
 
Top