सोलापूर : ग्रंथालय संचालनालयाच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस. आर. रंगणनाथन ग्रंथमित्र पुरस्कारासाठी दि. 31 ऑक्टोबर पर्यंत नामांकने पाठविण्याचे आवाहन प्र. ग्रंथलय संचालक डॉ. बा. ए. सनान्से यांनी केले आहे.
    राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक गंथालयांना अनुक्रमे रु.50000/-, रु. 30000/-, रु. 20000/-, रु. 10000 रोख , पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्हाने सन्मानित करण्यात येते.
    राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु. 25000/- रोख, पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु. 15000/- रोखी, पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
    सन 2013-14 पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत आपल्या विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक या कार्यालयाकडे सादर करावेत.
 
Top