सोलापूर : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सोलापूर व अंपगार्थ व्यावसायिक पुनर्वसन केंद्र सायन, मुंबई (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8. ऑक्‍टोबर ते दि. 10 ऑक्‍टोबर पर्यंत मद्दा मंगल कार्यालय, रविवार पेठ, कन्ना चौक, सोलापूर येथे सकाळी 10.30 वा. सोलापूर जिल्ह्यातील नि:समर्थ (अपंग) बेरोजगार उमेदवारांसाठी व्यावसायिक, रोजगार, प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल्याचे सहाय्यक संचालक र.म. हुमनाबादकर यांनी कळविले आहे.
    नि:समर्थांच्या (अपंगांच्या) वर्गवारी नुसार उमेदवारांनी नमुद दिनांकास सकाळी 10.30 वा. मार्गदर्शनासाठी उपस्थित रहावे. अस्थीव्यंग शैक्षणिक पात्रता एसएससी पर्यंतचे उमेदवार दि. 8.10.13, 11 वी व त्यापुढील शिक्षण पूर्ण केलेले दि. 9.10.13 आणि अंध / मुकबधीर सर्व उमेदवार दि. 10.10.13 रोजी.
    इच्छुक नि:समर्थ (अपंग) उमेदवारांनी नमूद केलेल्या दिनांकास त्यांची सर्व शैक्षणिक , वय, अनुभव, नि:समर्थ (अपंग) प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र (मूळ व सत्यप्रतीसह) व अलीकडे काढलेले पासपोर्ट आकाराचे दोन फोटोसह स्वखर्चाने उपस्थित राहुन या मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 0217-2622113 या दूरध्वनीवर संपर्क साधवा.      
 
Top