कळंब (बालाजी जाधव) : डिकसळ (ता. कळंब) येथील श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज संस्‍थानच्‍यावतीने विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या व्‍यक्‍तींना देण्‍यात येणारे पुरस्‍कार अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्‍यक्ष तथा संत पीठाचार्य ह.भ.प. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांनी जाहिर केले.

उन्‍मेष पाटील
बंडोपत दशरथ
सुभाष काकडे

कळंब येथील पत्रकार उन्‍मेष पाटील यांना विशेष पत्रकारिता सेवा पुरस्‍कार जाहीर करण्‍यात आला आहे. तर सामाजिक कार्यात उल्‍लेखनीय सेवा करणारे उत्‍तम बोडखे (आष्‍टी), तहसिलदार सुभाष काकडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे, ह.भ.प. रमेश महाराज मडके यांना कार्यसेवा पुरस्‍काराने गौरविण्‍यात येणार आहे. तर अखंडपणे वारक-यांना अन्‍नदान करणारे कळंब येथील व्‍यापारी बंडोपंत दशरथ, भिमराव नवले यांना अन्‍नदाता सेवा पुरस्‍कार तर भजनसेवा पुरस्‍कार ह.भ.प. आनंद वाघ,ह.भ.प. गोवर्धन पाटील यांना जाहिर करण्‍यात आला आहे.
    पुरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍तींना संस्‍थानच्‍यावतीने स्‍मृतीचिन्‍ह मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्‍यात येणार आहे. सदरील पुरस्‍काराने वितरण रविवारी दि. 27 ऑक्‍टोबर रोजी दुपारी दोन वाजता संत मंहत व विविध क्षेत्रातील मान्‍यवर मंडळींच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात येणार आहे. या पुरस्‍कार वितरण सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्‍येनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन संस्‍थानचे उत्‍तराधिकारी ह.भ.प. परमेश्‍वर महाराज बोधले यांनी केले आहे.
 
Top