मुंबई :- शासनाच्या क्रीडा विभागामार्फत व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्यावतीने 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, तबला, हार्मोनियम, सितार, गिटार, मृदंग, बासरी, भरतनाट्यम, वक्तृत्व, शास्त्रीय गायन, इ. सांस्कृतिक प्रकाराचा सहभाग असेल. या महोत्सवासाठी 15 ते 35 वयोगटातील युवक-युवती भाग घेऊ शकतील. विजयी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक व पारितोषिकेदिली जातील.
या महोत्सवामध्ये ज्या स्पर्धकांना भाग घ्यायचा असेल त्यांनी आपल्या प्रवेशिका 30 नोव्हेंबर, पूर्वी जिल्हा क्रीडा संकुल कार्यालय, सायन-वांद्रे लिंक रोड, धारावी बस आगार, धारावी येथे पाठवावी. अधिक माहितीसाठी 9702861171 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.