सोलापूर :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गट उत्पादीत वस्तुंचे विभागीय विक्री प्रदर्शन दख्खन जत्रा 2013 चे दिनांक 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर  या कालावधीत होम मैदान, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले. 
    यामध्ये दारिद्रय रेषेखालील महिला बचत गटांची उत्पादने व खाद्यपदार्थ प्रदर्शीत व विक्री करण्यात येणार आहेत. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर 2013 रोजी दुपारी 2 वाजता ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते व पाणीपुरवठा व पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून गृह, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. असे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर यांनी कळविले आहे.
 
Top