सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील दुस-या महायुध्दात भाग घेतलेल्या व सद्या रुपये 3000 दरमहा पेन्शन घेत असलेल्या माजी सैनिक व विधवा यांनी आपले हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. 30 नोव्‍हेंबर पूर्वी सादर करावेत. हे दाखले वर्षातून दोन वेळा माहे मे व नोव्हेंबर मध्ये देणे आवश्यक आहे. हयातीचे दाखले प्राप्त न झाल्यास सदरचे अनुदान/ पेन्शन बंद करण्यात येईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
 
Top