उस्मानाबाद -: केंद्रपुरस्कृत वैरण विकास योजने अंतर्गत मुरघास तयार करण्याचे युनीट स्थापन करणे या योजनेच्या अंमलबजावणी साठी गठीत समितीमार्फत लाभार्थीच्या नावे चिठठया टाकून सोडत पध्दतीने (लकी ड्रॉद्वारे) निवड करावयाची आहे. यासाठी 27 नोव्हेंबर 2013 रोजी कुक्कुट प्रकल्प उस्मानाबाद येथे सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी सदरील सोडत पद्वतीने केल्या जाणा-या लाभार्थीच्या निवड प्रक्रियेसाठी प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस.एस. भोसले यांनी केले आहे.