उस्मानाबाद -: जिल्हयातील खाजगी प्राथमिक अनुदानित, विना अनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व माध्यमाच्या शाळांचे सन 2013-14 या शैक्षणीक वर्षातील संच मान्यता कॅम्पचे आयोजन तालुकास्तर करण्यात आले आहे. त्यानसार, तुळजापूर येथे दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शांतीसागर प्राथमिक विदया मंदीर तुळजापूर, उमरगा व लोहारासाठी 26 नोव्हेंबर रोजी कुमारस्वामी प्राथमिक विदया मंदीर उमरगा, कळंब व वाशीसाठी 27 नोव्हेंबर रोजी लता मंगेशकर प्राथमिक विदया मंदीर कळंब तर भूम व परंडासाठी , 28 नोव्हेंबर 2013 रोजी जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर, परंडा येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. उपरोक्त ठिकाणी दुपारी 12 वाजता विहित नमुन्यातील प्रस्तावासह शाळेचे मुख्याध्यापक व लिपीक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले आहे.