नवी दिल्ली :- डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर 50 पैशांनी वाढ करण्यात आली असून पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डिझेलचे नवीन दर शनिवारी मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत. जानेवारी महिन्यापासून तब्बल 11 वेळा डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत.
    स्थानिक कर आणि व्हॅट यांची आकारणी ठिकठिकाणी वेगवेगळी असल्याने डिझेलच्या दरांमधील वाढही भिन्नभिन्न राहणार आहे. दिल्लीत डिझेलच्या दरात 57 पैशांनी वाढ झाली असून आता दर प्रति लिटर 53.67 रुपये राहतील. मुंबईत डिझेल लिटरमागे 60.70 रुपयांना मिळणार आहे. सध्या हा दर 60.08 रुपये प्रति लिटर आहे.
    डॉलरच्या तुलनेत रुपया 25-30 पैशांनी घसरला असला तरी याचा ताण ग्राहकांवर न टाकण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
 
Top