सावित्रीबाई फुले विद्यालयात फुले यांना अभिवादन
कळंब (बालाजी जाधव) : शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्‍मा फुले यांची पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. महात्‍मा फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती मनोरमा भवर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
    महात्‍मा फुले यांच्‍याविषी शाळेतील शिक्षक काकासाहेब मुंडे यांनी आपले विचार व्‍यक्‍त केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्‍यांनी 'महात्‍मा फुले अमर रहे' अशी घोषणा केली व शाळेचे परिसर दणाणून टाकला. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्‍या पर्यवेक्षिका श्रीमती अलका देवरे, ज्ञानेश्‍वर तोडकर आदीजण उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर गोंदकर यांनी केले तर आभार तानाजी मोरे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी उपस्थित होते.

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेतर्फे शिक्षकदिन साजरा
कळंब :- क्रांतीसूर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या स्‍मृती दिनानिमित्‍त वीर भगतसिंह विद्यार्थी परि‍षदेतर्फे शिक्षकदिन साजरा करण्‍यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी चौकामध्‍ये महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले.
    देशातील बहुजन समाजांच्‍या मुलांना शिक्षण मिळावे, म्‍हणून आपले सर्वस्‍व अर्पण करुन आपल्‍या देशातील पहिले शिक्षक म्‍हणजे महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी शिक्षकांची गंगा दारा-दारात पोहचवली. म्‍हणून विद्यार्थी परिषदेतर्फे महात्‍मा फुले यांचा स्‍मृतीदिन हा शिक्षक दिन म्‍हणून साजरा करण्‍यात आला. यावेळी विद्यार्थी परिषदेने महात्‍मा ज्‍योतीबा फुले व सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन यांच्‍या बद्दलची सर्व माहिती एका पत्रामध्‍ये काढून सर्व पत्रके कळंब येथील शि.म. ज्ञानदेव मोटे महाविद्यालय, सावित्रीबाई फुले माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय, वसंतराव काळे महाविद्यालय, रणसम्राट शाळा, महाविद्यालयात जाऊन शिक्षक व विद्यार्थी यांना माहिती पत्रके वाटून सर्व शिक्षकांचा सत्‍कार करण्‍यात आला. तसेच महात्‍मा फुले यांच्‍या जीवन चरित्रावरती विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात आले. या उपक्रमास शहरातील शाळा, मह‍ाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
    हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी विद्यार्थी, युवक, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी वीर भगतसिंह विद्या‍र्थी परिषदेचे जिल्‍हाध्‍यक्ष सागर बाराते, उपजिल्‍हाध्‍यक्ष बालाजी सुरवसे, तालुकाध्‍यक्ष विनोद यादव, शहराध्‍यक्ष राजेश काळे, मोहेकर कॉलेजचे विद्यापीठ प्रतिनिधी गोविंद चौधरी, कळंब तालुका मराठा सेवा संघाचे प्रकाश घस, प्रवक्‍ते अतुल गायकवाड, प्रेम मडके, आकाश शेळके, विशाल पुरेकर, रविंद्र गालफाडे, प्रा. बोंदर आदीजण उपस्थित होते.

महात्‍मा फुले यांची पुण्‍यतिथी साजरी
कळंब -: येथील नगरपरिषदेमध्‍ये क्रांतीसूर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांची
पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. यावेळी नगराध्‍यक्ष शिवाजी कापसे यांच्‍या शुभहस्‍ते महात्‍मा फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. या कार्यक्रमास बांधकाम सभापती अतुल कवडे, कार्यालय अधिक्षक डी.एम. मांडवकर, नगर अभियंता डी.जे. कवडे, करनिकरक्षक के.ए. मुल्‍ला, स्‍वच्‍छता निरीक्षक आर.एस. गायकवाड यांच्‍या कर्मचारी, मान्‍यवर उपस्थित होते.



हसेगावात महात्‍मा फुले पुण्‍यतिथी साजरी
कळंब : तालुक्‍यातील महात्‍मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्‍था हसेगाव केज येथे विविध उपक्रमाने महात्‍मा फुले यांची पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. संस्‍थेचे सचिव भागवत तोडकर यांनी महात्‍मा फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून शेतकरी गटाचे हरीभाऊ करंजकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास तोडकर यांनी केले तर प्रदीप यादव यांनी आभार मानले.
 
Top