उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित, मागासवर्गीय, भटके व आदीवासी लोकांवर वारंवार अन्याय अत्याचार होत आहेत. त्या अत्याचारा विरोधात अन्याय अत्याचार विरोधी परिषदेचे आयोजन उमरगा येथे रविवार दि. 1 रोजी करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी शुक्रवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
     ही परिषद डॉ. बाबासाहेब अंबेडकर सांस्कृतीक महोत्सव समीती पुणे यांच्या वतीने उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित केली आहे. सदर परिषदेच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फुटली पाहिजे. अत्याचार करणा-या गुन्हेगारावर योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे. व अन्याय अत्याचार बंद झाले पाहिजेत. या सर्व बाबींवर योग्य ते निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्‍यात येईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रावसाहेब कसबे तर उद्घाटक म्हणुन  अर्जून डांगळे  हे उपस्थित राहणार आहेत.
    परिषदेचे निमंत्रक जि.प. सदस्य कैलास शिंदे, धिरज बेळंबकर, प्रा. डी.के. कांबळे, दत्ता रोंगे, दिगंबर भालेराव पोपटराव सोनकांबळे, राहणार आहेत. यावेळी प्रल्हार लुलेकर, प्रा. राजकुमार कांबळे, मनिषा टोकळे, डॉ. नितेश नवसागरे, प्राचार्य दिलीप गरूड, प्रा.ज्योती वाघमारे, मोतीराज राठोड, हे मार्गदर्शन करणार आहेत.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब अंबेडकर सांस्कृतीक महोत्सव समीतीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर माणुसकी संस्था पुणेच्या प्रियदर्शी तेलंग आदी उपस्थित राहणार असल्याच सांगितले. चा परिषदेला महाराष्ट्र, कर्नाटक व आंधप्रदेश राज्यातील बांधव उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत कैलास शिंदे, प्रा. डी.के. कांबळे, हरीष डावरे, दिगंबर भालेराव, दत्ता रोंगे, नवनाथ डांगे, परशुराम वाडेकर, शिवाजी कांबळे, शहाजी मस्के यांची उपस्थित होती.
 
Top