उस्मानाबाद -: बुद्धांनी निसर्गाच्या मांडीवर डोके ठेवून अंतराळाचे अवलोकन केले. त्यांचे तत्त्वज्ञान व्यापक स्वरूपाचे असून, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्यामुळे आपले अस्तित्व नष्ट होईल, या भीतीमुळे 'अंधार' शेकडो वर्षांपासून त्यांच्याजवळ गेलेला नाही. बुद्धांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या सानिध्यात येणार्या प्रत्येकाचे जीवन प्रकाशमान होईल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद येथील पुष्पक मंगल कार्यालयात बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने दुसर्या बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. मनोहर बोलत होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे, काँग्रेस नेते विश्वास शिंदे, बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, नगराध्यक्षा रेविता बनसोडे, साहित्यिक योगिराज वाघमारे, डॉ. भन्ते खेम धम्मो, पत्रकार धनंजय रणदिवे संयोजक यशपाल सरवदे, धनंजय शिंगाडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. मनोहर म्हणाले की, पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनीही बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला सलाम केला होता. बुद्ध हे परंपरावादी नसून क्रांतीकारी आहेत, ही ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे होऊ शकली. बुद्धांनी मांडलेले तत्त्वज्ञान खरेपणाने आचरण करणारांसाठी अवघड नाही. मात्र, वाईट मार्गाने जगणारांसाठी हे तत्त्वज्ञान समजण्यास कठीण आहे.
बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेबांच्या प्रमाणशास्त्रात जे बसत नाही, ते मी मानत नाही. ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, परलोक ही संकल्पना खोटी आहे. धम्मासंबंधी आपण धर्माच्या परिभाषेत बोलणे टाळायला हवे. ईश्वर, आत्मा, परलोक, पुनर्जन्म, मोक्ष, अध्यात्म या सर्वच बाबी दैववादाशी आणि विषमतेच्या खुंटीला टांगलेल्या आहेत. हे सर्वच नाकार नाकारणार्यांना आणि इहवादी जीवनशैलीशी नाते जोडणार्या धम्म अनुयायांची भाषा पूर्णत: वेगळी असायला हवी. दरम्यान, साहित्य संमेलनाचा उपक्रम बोधीवृक्षाप्रमाणे, वटवृक्षाप्रमाणे वाढला पाहिजे. तसेच बौद्ध धम्मच्या तत्त्वज्ञानाचा विस्तार होण्यासाठी साहित्यिकांनी वाङमयीन सौंदर्यातून मांडणे गरजेचे आहे. त्यासाठी साहित्यिकांनी कथा, कादंबरी, कवितांची रचना करावी, असे आवाहनही डॉ. मनोहर यांनी यावेळी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला चांगली राज्यघटना मिळाली. राज्यघटनेने गरीब, र्शीमंतांना समान मताधिकार दिला आहे. त्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत झाली आहे. डॉ. बाबासाहेबांची विद्वत्ता वादातीत आहे. त्यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे, असे ना. मधुकरराव चव्हाण बोलताना म्हणाले.
समाजकल्याणासाठी महापुरुषांनी चांगले विचार मांडले आहेत. मात्र, दुर्दैवाने आज महापुरुषांच्या विचारांचा विसर पडत चालला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकांमध्ये डॉल्बीवर अश्लील गाणी लावली जातात. त्यामुळे महापुरुषांचा सन्मानाऐवजी अवमान होतो. त्यामुळे जयंतीनिमित्त जमा केलेल्या वर्गणीतून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करावा. सध्याची जयंतीची पद्धत बदलण्याची गरज आहे, असे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर बोलताना म्हणाले.
प्रास्ताविक धनंजय शिंगाडे यांनी केले. यावेळी यशपाल सरवदे, ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले.