बार्शी -: जामगांव (पा.) ता.बार्शी येथील बाहेरगावी नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या व्यक्तींनी दिपावलीनिमित्त गावाकडे आल्यावर गावच्या वाचनालयात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची भर टाकली.
    बार्शी तालुक्‍यातील जामगाव (पा.) येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक वाचनालयात स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांची कमतरता असल्याची गरज ओळखून पुस्तके भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. सुमारे वीस हजार रुपये किंमतीची अत्यावश्यक असलेल्या विविध १२० पुस्तके व कपाट वाचनालयास भेट देऊन अनोखा उपक्रम व यानिमित्ताने गावातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. अभियंता नारायणराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलतांना भोसले यांनी म्हटले, शालेय जीवनापासूनच आपले ध्येय निश्‍चित करुन सातत्यपूर्ण कठोर परिश्रम केल्यास निश्‍चित यश मिळते. विद्यार्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची गरज असल्याचे ओळखून ग्रामस्‍थांनी वर्गणीतून उपलब्ध केलेली पुस्तके उपयोगाची आहेत. याचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय पूर्ण करावे. दिपक सातपुते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजाभाऊ सातपुते, ज्ञानेश्वर मस्के, नितीन नूवरे, वनाधिकारी अमोल सातपुते, शिवतेज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, सुत्रसंचलन रविंद्र खंदारे यांनी तर आभार विनोद सातपुते यांनी मानले.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top