बार्शी : आगळगाव (ता.बार्शी) येथील सुंदिवली पीरसाहेब यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांसह गेले आठ दिवसांपासून सुरु असलेल्या गावच्या यात्रेची सांगता झाली.
या यात्रेच्या निमित्ताने गावात कुस्त्यांचा फड, डार्लिंग डार्लिंग नाटक, शोभेचे दारुकाम, सांस्कृतिक कार्यक्रम, बँड पथक स्पर्धा, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध गुणवंतांचा सत्कार आदी कार्यक्रम करण्यात आले. शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर रोजी पुणे येथील मदमस्त अप्सरा या मराठी, हिंदी गीत व लावण्यांचा कार्यक्रम झाला. राधिका पाटील, स्वप्नाली घुगे, नम्रता महामनकर या कलावंतांच्या बहारदार कलाविष्काराने ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले.
यात्रा कालावधीत फौजदार सुधाकर ठाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाने व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला. कै. सुरेश मोरे प्रतिष्ठानच्यावतीने कार्यक्रमातील पंच यांचा सत्कार करण्यात आला.
(मल्लिकार्जून धारुरकर)