कळंब :- मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील युवकांनी पवन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी युवकांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पवन कांबळे यांच्यासमवेत विकास कांबळे, ओंकार कसबे, संतोष कांबळे, प्रशांत कांबळे, चंद्रकांत मारकळ, दिलीप कांबळे, किरण कांबळे, अक्षय कांबळे, किसन कांबळे आदींसह शेकडो युवकांनी प्रवेश केला. यावेळी मंगरुळ ग्रामस्थांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top