अपर्णा बेडगे
नळदुर्ग -: येथिल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. अपर्णा अरविंद बेडगे यांना नगराध्यक्षपदाचा पदभार द्यावा, अशी मागणी होत असून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तात्काळ अशी दाखल घेवून अपर्णा बेडगे यांना नगराध्यक्षपदाचा पदभार द्यावा अशी, मागणी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
       फेब्रुवारी 2013 मध्ये सौ. अपर्णा अरविंद बेडगे यांची न.प.च्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती. लिंगायत समाजाला न.प.चे उपाध्यक्षपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नळदुर्ग न.प.चा एक इतिहास आहे की, न.प.च्या उपाध्यक्षाला उपाध्यक्षपदाच्या कालावधीत किमान एक ते दोन महिने अध्यक्षपदाचा पदभार दिला जातो. . अपर्णा बेडगे यांची उपाध्यक्षपदी निवड होवून नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र अद्याप त्यांना अध्यक्ष पदाचा पदभार मिळालेला नाही. वास्विक पाहता त्यांना यापूर्वीच अध्यक्षपदाचा पदभार मिळणे गरजेचे होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही त्यांना अध्यक्षपदाचा पदभार देण्याचे अाश्वासन देवूनही अद्याप त्यांना अध्यक्षपदाचा पदभार का मिळाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वीचे उपनगराध्यक्ष शहबाज काझी यांना तात्कालीन नगराध्यक्ष नितीन कासार यांनी पक्षश्रेष्टींच्या आदेशानुसार दोन महिन्याचा अध्यक्षपदाचा पदभार दिला होता. सध्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या ठरविल्यानुसार नगराध्यक्ष बदलाच्या हलचाली सुरू आहेत. कारण पहिल्या अडीच वर्षासाठी अनुक्रमे नितीन कासार, शब्बीर सावकार यांना नगराध्यक्ष करण्याचे ठरले होते. त्यानुसार प्रथम नितीन कासार नगराध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शब्बीर सावकार नगराध्यक्ष झाले. आता शहबाज काझी त्यांचा नंबर असून येत्या काही दिवसात काही बदल होण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे नगराध्यक्ष बदलण्यापूर्वी उपनगराध्यक्षा अपर्णा बेडगे यांना अध्यक्ष पदाचा पदभार मिळणे गरजेचे आहे. कारण नगराध्यक्ष बदलल्यानंतर नवीन होणा-या अध्यक्षांचा केवळ सहाच महिण्याचा कालावधी अध्यक्षांना अध्यक्षपदी पदभार मिळणे गरजेचे आहे. उपाध्यक्षा अपर्णा बेडगे या पदवीधर असून त्यांना अध्यक्षपदाचा पदभार देवून त्यांना न.प. च्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी देणे गरजेचे आहे. तशा प्रकारची मागणी कॉग्रेस कार्यकर्ते तसेच शहरवासीयातून होत आहे.
 
Top