पांगरी (गणेश गोडसे) -:   पवनचक्यांच्या प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर असल्याचे कंपन्यांच्या हालचाली व प्रात्याक्षिकांवरून निदर्शनास येत आहे. संबंधीत परराज्यातील विजनिर्मिती करणा-या कंपनीने महाराष्ट्रातील बडया धेंडांना हाताशी धरूण भविष्यात सोन्याहुन पिवळे दिवस येणा-या शेतीचे कवडीमोल प्रमाणात खेरेदी सत्र अवलंबुन त्यावर मोठमोठे मनोरे उभे करण्‍याचा चंग बांधला असल्याचे निदर्शनास येत आहे. या भागातील सर्वसामान्य अल्पभुधारक शेतक-यांसह बागायतदार शेतक-यांमध्येही भितीचे वातावरण पसरले असुन पवनचक्यांचे प्रकल्प अस्तीत्वात आल्यास आपल्यावर काय वेळ येईल या एकाच विचाराने सध्या ते भयभित झाले आहेत.
   सध्या जमिन खरेदीदाराने प्राथमिक तपासणी करन्यासाठी खरेदी केलेल्या डोंगरमाथ्यावर उंचच उंच रेंज टॉवर उभे करन्याचे काम सुरू केले आहे. या रेंज मनो-यांच्या आधारे वा-याचा प्रवाह त्याची गती दिशा याचे निरीक्षण करन्याचे काम सुरू असुन त्यानंतरच येथे किती क्षमतेचा पवनचक्की प्रकल्प सुरू करायचा याचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या ही सर्व कामे ही अत्यंत गुप्त पदधतीने सुरू असुन काय सुरू आहे याची कानोकान खबर कुठे होऊ नयेत असेच वरिष्ठांचे आदेश असल्याचे समजते. कंपनीतर्फे महत्वाच्या महत्वाच्या ठिकाणी सध्या टॉवरेचे मनोरे उभे करून अंदाज घेतला जात आहे. चच उंच उभे रहात असलेले मनोरे कशाचे आहेत हाही कुतुहलाचा विषय ठरत आहे. तकरीही याकडे अनभिज्ञपणे पहात आहेत. कांही शेतक-यांना तर जमिनी कशासासाठी खरेदी केल्या जात आहेत, याचीसुदधा कल्पना दिली जात नाही.
    ब-याच घटना घडत असल्या तरीही प्रशासन मात्र या बाबींपासुन अज्ञभिज्ञच आहे. वा-यांच्या प्रवाहाच्या दिशेचा अंदाज घेण्‍यासाठी उंच मनोरे उभे करून अंदाज बांधण्‍याचे काम जरी सुरू असले तरी अद्याप कोणत्याही कंपनी अथवा प्रकल्पचालकाने या भागात पवनचक्यांच्या प्रकल्पांसाठी अथवा टॉवर उभे करण्‍यासाठी रितसर परवानगी अर्ज आमच्याकडे सादर केला नसल्याचे पांगरी मंडलचे मंडल अधिकारी .एस.व्ही.बदे यांनी बोलताना सांगितले. परवानगीसाठी अर्ज आल्यानंतरच काय ते समोर येणार असुन सध्या मात्र या भागातील शेतकरी भितीयुक्त वतावरणात जगत आहे. त्यांच्या डोक्यात पवनचक्यांचे भुत अक्षरक्ष थैमान घालत आहे. ब-याच घडामोडी घडत असल्या व अनेक शेतक-यांना याचा अंदाज आलेला असला तरीही ते शेतकरी अथवा कोणीही सुजान नागरिक या गंभीर विषयावर भाष्य करण्‍यास तयार नसुन ते फक्त थांबा आणि पहाचीच भुमिका बजावु पहात आहेत. कोणीतरी जादुगार येऊन जादुची कांडी फिरवुन आपली यातुन सुटका करतील अशाच कांहीशा भ्रमात येथील शेतकरी व जनता आहे. मात्र पाण्यात बुडताना जशी धडपड करून त्यातुन आपला बचाव करावा लागतो, तसाच प्रकारातुन येथेही वाचावे लागणार आहे.
    शेतक-यांना देशोधडीला लावुन त्यांचे संसार उध्‍दवस्‍त करून लाखमोलाच्या जमिनी घशात घालण्‍याच्या या प्रकारावर व सुरू असलेल्या प्रकियेसंदर्भात प्रशासनाने चौकशी करुन पवनचक्या होणार की नाहीत यावर खुलासा करून जनतेला धीर द्यावा,  अशी सर्वसामान्य शेतक-यांची मागणी आहे.


 
Top