परंडा -: ईडा (ता. भूम) आई व मुलास येथे तलवारीचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी रोख रक्कम व सोने, चांदीच्या दागिन्यांसह तीन लाख 91 हजार रुपयांचा ऐवज पलायन केल्याची घटना शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी पहाटेपूर्वी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
भूम तालुक्यातील ईडा ता. भूम येथील विश्वजीत मोहन उगलमुगले हे त्यांच्या आई-वडिलांसह शुक्रवारी घरात झोपले होते. मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास वाड्याचा मुख्य दरवाजा लोटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतमधील दरवाजाला कडी लावली असल्याचे पाहून तिघांनी घराच्या भिंतीवरून उड्या मारून खोली गाठली. एकजण पहारा देत बाहेर थांबून होता. आत गेलेल्या तिघांनी विश्वजीत व त्यांच्या आईच्या गळ्यावर तलवार ठेवून 'दागिने व रक्कम कोठे ठेवली आहे सांग, अन्यथा तुझी खांडोळी करून टाकू' असा दम दिला. यामुळे त्यांनी कपाटात ठेवलेल्या रकमेची माहिती सांगितली. कपाटातील सोन्याची दीड तोळ्याची बोरमाळ, तीन तोळ्यांच्या पाटल्या, दोन अंगठय़ा, मंगळसूत्र, कानातील फुले, कपड्यांची पेटी असा एकूण तीन लाख 91 हजार 170 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. विश्वजीत यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात पहाटेच गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन सुरवसे करत आहेत.