पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) परिसरात पेरणीची मोठी लगबग सुरू असुन खते, बी-बियाणांची जुळणी करण्यासाठी शेतक-यांची एकच धांदल उडाली आहे. काही भागात शेतक-यांनी अगोदरच पेरण्या उरकुन घेतल्या आहेत. गत तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थतीनंतर यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस पडल्यामुळे शेतकरी खुश दिसत आहे.
यंदा तरी निसर्ग हातात कांहीतरी देऊन आपल भल करेल या हेतुने व आत्मीक समाधानाने तो पुन्हा उभे रहावुन नव्या जोमाने शेतीच्या कामाला लागला आहे. मात्र शासनाने ज्वारी, गहु आदी पिके डिसेंबरअखेर स्वस्तात सर्वसामान्यांना देण्याचे जाहीर केले असल्यामुळे शेतक-यांनीही आपला मार्ग बदलला असुन ज्वारी ऐवजी अनेक शेतकरी इतर नगदी पिकांकडे वळलेले असल्याचे निदर्शनास येत आहे़. शासनाने जाहीर केलेल्या अन्नधान्य सुरक्षा विधेयकाची डिसेंबर अखेर अमंलबजावणीची घोषणा फेल गेल्यास ज्वारी भाव खाण्याची शक्यता आहे. कारण एक रूपये किलोने स्वस्तात ज्वारी मिळाल्यास शेतक-यांनी उत्पादित केलेली ज्वारी कोण खरेदी करणार हा प्रश्न असल्यामुळे अनेक शेतकरी ज्वारी करण्यास टाळाटाळ करू पाहत आहेत.

चार वर्षांनंतर पाथरी साठवण तलावातुन पाणी सुटणार
सलग तीन वर्ष पडलेल्या भीषण दुष्काळात संपुर्ण होरपळुन निघालेल्या पांगरी भागातील शेतक-यांच्या अंगावरील कातीन निघण्याची शक्यता असुन चार वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच पिकांसाठी पाथरी साठवण तलावातुन पाण्याच्या पाळया सोडल्या जाणार असल्याची सुखद बातमी आहे. त्यासंदर्भात पाटबंधारे खात्याने फॉर्म भरून देण्याचे आवाहनही केलेले आहे. त्यामुळे सोडण्यात येणा-या पाण्याच्या पाळीवर तरी किमान चांगली पिके जोपासन्याच्या विचारात शेतकरी राज आहे.

ऊसाच्या क्षेत्रात भरीव वाढ
पांगरी परिसरातील पाथरी, पांढरी, चोराखळी, झानपुर, या प्रकल्पात गरजेपुरता पाणी साठा झालेला असल्यामुळे व अनेक शेतकरी पुन्हा आपल्या जुन्या उस पिकांकडे वळु लागल्यामुळे परिसरात उस लागवडीचाही हंगाम जोरात सुरू आहे. दुष्काळात पुर्णतः कंगाल झालेला व मातीला मिळालेला ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोशात व उमेदीने ऊसनवार करून ऊस लागवड करू लागलेला आहे. परिसरात सध्यातरी समाधानकारक असलेल्या पाण्यावर शेतकरी आपल्या विचारांचे मनोरे बांधुन भविष्यातील नियोजन करत आहेत. तीन वर्षातील दुष्काळात घटलेल्या उसाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी शेतकरी उसाकडे वळत असला तरी ज्या ऊस ऊत्पादक शेतक-यांकडे ऊसाचे बेने शिल्लक आहे, ते शेतकरी मात्र चांगलाच भाव खाऊ लागल्याचे ऊत्पादकांमधुन बोलले जात आहे. एरव्ही कारखान्यांना कवडीमोल किंमतीत ऊस कारखान्यांपर्यंत पोच करणारे शेतकरी नविन उस ऊत्पादक होऊ पाहणा-या शेतक-यांना मात्र अडवुन त्यांच्याकडुन जास्तीचे व तेही रोकड पैसै वसुल करत आहेत. कारखान्यांकडे वर्ष-वर्ष पैसै ठेवणारा शेतकरी येथे मात्र गावातील रोजच्या संबंधातील व परिचयाच्या पिचलेल्या शेतक.यांकडुन मात्र सक्तीने जास्तीचे व जलद पैसै वसुल करून घेत आहे.

तुरीवर आळीचा प्रादुर्भाव
पांगरी विभागात पावसाचे जेमतेम प्रमाण असल्यामुळे व तुर हे अत्यल्प पाण्यावर येणारे पिक असल्यामुळे यावर्षी ब-यापैकी क्षेत्रावर तुरीची पेरणी झालेली होती. सध्या तुरींची पिके चांगलीच भराला आलेली असताना व काही ऐन फुलात असताना सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरींवर उंट आळी पान गुंडाळणारी आळी आदी प्रकारच्या आळयांचा मोठया प्रमाणात प्रभाव जानवत असुन आळी औषध फवारणी करूनही आटोक्यात येत नसल्यामुळे तुरीच्या पिक ऊत्पन्नात घट होन्याची व ऊत्पादक शेतक-याला मोठा फटका बसन्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विज वितरणची सुलतानी वसुली जोमात
पांगरी परिसरातील अनेक गावातील थकबाकीदार शेतक-यांकडे असलेली बाकी विज वितरण कंपनी सुलतानी पध्दतीने वसुल करताना दिसत आहे. गत तिन वर्ष शेतक-यांच्या विहीरींना पाणीच उपलब्ध नहते. त्यामुळे या शेतक-यांकडे थकबाकी वाढली आहे. शेतक-यांना सलग तिन वर्ष शेतीतुन ऊत्पन्नच मिळु शकले नसल्यामुळे बिल कोठुन भरायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतानाच सध्या शेतातुन कांहीतरी ऊत्पन्न अपेक्षित असतानाच वितरण कंपनीने शेतक-यांकडे थकबाकी भरण्याचा तगादा लावुन वसुली मोहिम राबवली आहे. शेतक-यांनी सध्या विहीरीतील उपलब्ध पाण्यावर कांदा, हरभरा, मका, ऊस असे कांहीतरी नगदी पिक केलेले असुन किमान ते पिक तरी त्यांच्या पदरात पडल्यास शेतक-यांना थोडासा आर्थिक लाभ होऊन वितरण कंपनीलाही त्याचा फायदा होऊ शकतो. तरी जबरदस्तीची विज बिल वसुली थांबण्याची शेतक-यांची मागणी आहे.