बार्शी : बँकेच्या लॉकरमध्ये दागीने ठेवण्यास गेल्यानंतर तीस तोळे सोन्याचे दागीने असलेली कॅरीबॅग घेऊन चोरटा पळून गेल्याने बार्शीत खळबळ उडाली आहे.
युवराज मनोहर पाटील (वय ३० रा.शिवाजी नगर, बार्शी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. येथील बस स्थानकासमोर असलेल्या स्टेट बँकेत अधिकार्यांशी भेटून घरी जाऊन सोन्याचे दागीणे ठेवण्यास घेऊन आल्यानंतर बँकेच्या अधिकार्यांनी सोन्याचे दागीणे तपासणी करणारा सोनार सध्या उपलब्ध नसल्याने सोमवारी परत येण्यास सांगीतले. यानंतर प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये असलेल्या दागीन्यांची पिशवी घेऊन पाटील निघाले असतां अचानकपणे त्यांच्या खांद्याजवळ व पाठीवर खाजवण्यास सुरुवात झाली. सदरच्या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या पाटील यांनी मार्केट यार्ड जवळील त्यांचा मित्र दुर्गेश गुळवे यांच्या महालक्ष्मी एजन्सीज या दुकानात जाऊन सोबत असलेल्या चुलत भाऊ रणजीत यास पाठीवर खाजवण्यास सांगीतले. यावेळी त्यांचा मित्र दुकानी हजर नसून त्यावेळी दोन गिर्हाईक काहीतरी वस्तू खरेदी करत होते. या दरम्यान साडेपाच फुट उंचीचा टक्कल पडलेला अंगावर पिवळसर रंगाचा शर्ट परिधान केलेला एक अनोळखी व्यक्ती मित्राच्या दुकानात आला होता व काही मिनीटांत त्याने पाटील यांचे लक्ष नसल्याचे पाहून टेबलवर ठेवलेली सोन्याचे दागीणे असलेली प्लास्टीकची पिशवी घेऊन फरार झाला. काही मिनीटांत त्यांची पिशवी नसल्याचे लक्षात आले परंतु तो अज्ञात चोरटा दिसेनासा झाल्याने आपली फसवणूक व चोरी झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.
सदरच्या प्रकारानंतर बार्शी पोलिसांत तात्काळ खबर देऊन तक्रार दाखल केली. सदरच्या चोरी गेलेल्या दागीन्यांमध्ये ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे तोडे २, मोराचे चित्र असलेले पदक, सोन्याचे गंठण ६५ ग्रॅम वजनाचे, ५० ग्रॅमचे सोन्याचे राणीहार, ४० ग्रॅमची सोन्याची चेन, ४५ ग्रॅमचे डिझाईनचे सोन्याचे गंठण, ४५ ग्रॅमचे सोन्याचे डिझाईनचे नेकलेस असे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
सदरच्या प्रकारानंतर बार्शी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी शहरातील सर्व मार्गावर पोलिसांचे एक पथक पाठवून अज्ञान चोरट्यांचा शोध घेतला. सदरच्या घटनेची नोंद बार्शी पोलिसांत झाली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिषेक डाके हे करीत आहेत.

(मल्लिकार्जून धारुरकर)