उस्मानाबाद :- जिल्हा वार्षिक योजना सन 2014-15 साठीच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजनेच्या खर्चाच्या एकूण 159 कोटी 11 लाख रुपयांच्या आराखड्यास लहान गटाने आज मंजूरी दिली.
गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा आमदार राहुल मोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नामनिर्देशित केलेले जिल्हा परिषद आणि नगरपालिका क्षेत्रातील दोन सदस्य सुधाकर गुंड गुरुजी व नादेरउल्ला हुसेनी, जिल्हाधिकारी डॅा. के. एम. नागरगोजे, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांची यावेळी उपस्थिती होती.
आजच्या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 114.20 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 43 कोटी 33 लाख आणि आदिवासी उपयोजनेसाठी 1 कोटी 58 लाख रुपयांच्या प्रस्तावित नियतव्ययास तत्वता मान्यता देण्यात आली. यावेळी आमदार मोटे यांनी सन 2013-14 साठी संबंधित विभागास मंजूर करण्यात आलेला निधी वेळेवर खर्च करावा, असे सांगितले. त्याचबरोबर, सर्व शासकीय यंत्रणांनी 2014-15 साठी निधीची मागणी करताना तो वेळेवर खर्च होईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश आ. मोटे यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अनिल शेंदरकर, आदिवासी विभागाचे एकात्मिक प्रकल्प अधिकारी गोलाईत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.