तेंडुलकरच्या निवृत्तीवर बार्शीतील क्रिकेटप्रेमींची मते
भारतामध्ये मैदानी खेळांमध्ये जास्त लोकप्रिय आणि क्रीडाप्रेमींना नेहमी आकर्षणाचा असलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहता येईल. क्रिकेटमध्ये संपूर्ण जगाचा आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधील निवृत्ती ही प्रत्येकालाच वेळेच्या अगोदर होत असल्यासारखे वाटत आहे. त्याचा आदर्श घेऊनच जगातील सर्व खेळाडू आपल्या गुणांचा विकास करतांना दिसत आहेत.
विजय (नाना) राऊत :
सचिनने आणखी खेळावे असे वाटते. अंतिङ्क साङ्कना पाहिला असता सचिनचेचे पूर्वीचेच स्ट्रोक व जोश आहे असाच होता. सचिन निवृत्त होत आहे याचे दुःख वाटते भविष्यात सचिनने तरूण क्रिकेटर्संना प्रोत्साहन द्यावे.
बाळासाहेब पुरोहित :
सचिनने आणखी खेळावे असे वाटते. अंतिम सामना पाहिला असता सचिनचेच पूर्वीचेच स्ट्रोक व जोश आहे असाच होता. सचिन निवृत्त होत आहे. याचे दुःख वाटते, भविष्यात सचिनने तरुण क्रिकेटर्संना प्रोत्साहान द्यावे.
शकील मुल्ला :
टीव्हीवर क्रिकेटच्या देवाचा खेळच पाहत बसलो होतो. यापुढे केवळ त्याची पूजा करत राहायचे आहे.
दिनकर रूद्राके :
क्रिकेट या खेळामध्ये सचिन तेंडुलकरचे योगदान चांगले आहे. देशातील तरूण पिढीच्या खेळाडूंना क्रिकेटमध्ये संधी मिळणेही गरजेचे आहे. क्रिकेट मध्ये अनेक विक्रम करणार्या सचिनने यापूर्वीच निवृत्ती घेणे गरजेचे होते जेणे करून शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहिली, चेतेश्वर पुजारा सारख्या नवोदितांना क्रिकेटमध्ये चमकण्याची संधी मिळाली असती.
विशाल गुगळे :
सचिन हा क्रिकेटचा देवच आहे. सचिन शिवाय क्रिकेट पाहणे माझ्या सारख्या क्रिकेटप्रेमीला शक्यच नाही. सचिनने अजूनही खेळणे गरजेचे होते. सचिनने क्रिकेटमधील स्ट्रोक तरूणांना क्रिकेटसाठी बूस्ट असतील. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने सचिनच्या जीवनातील दुसर्या इंनिंगसाठी शुभेच्छा..!
अस्लम पठाण :
सचिन सारखा महान खेळाडू क्रिकेट जगतात नाही. सचिनची निवृत्ती मनाला चटाक लावणारी आहे. क्रिकेट पदापर्णातच सचिनने पाकिस्तानच्या अब्दुल कादीरसारख्या महान गोलंदाजाची धुलाई करत लगावलेले षटकार आजही आठवतात. तसेच 1944 मध्ये शारजा क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुध्द सचिनने केलेले 143 रनाची खेळी अविस्मरणीय आहे.
- (मल्लिकार्जून धारुरकर)