बार्शी -: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवसानिमित्‍त बार्शी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सौ.प्रभावती सुरेशचंद्र कुंकूलोळ शिशु विकास केंद्रात बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या बाल आनंद मेळावाचे उद्घाटन गुरुवार रोजी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मानद सचिव डॉ.काका सामनगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विनय संघवी, रामचंद्र सोमाणी, सुरेशचंद्र कुंकूलोळ, विवेकानंद देवणे, प्रताप जगदाळे, दिलीप कराड, अजित कुंकूलोळ, सुभाष जवळेकर, प्रा.कल्याण घळके आदि मान्यवर उपस्थित होते.
     पहिल्या सत्रातील १ ते ३ व ३ ते ५ या वयोगटात घेण्यात आलेल्या सुदृढ बालक स्पर्धत शहर परिसरातील सुमारे ३०० बालकांनी सहभाग नोंदविला. शहरातील बालरोग तज्ञ डॉ.हरिष कुलकर्णी, डॉ.सुनील पाटील, डॉ. अमित लाड, डॉ.प्रशांत मोहिरे, डॉ.अविनाश लुकडे, डॉ.बाळासाहेब देशपांडे यांनी आरोग्य तपासणी व परीक्षकाचे काम पाहिले. दुसर्‍या सत्रात सोलापूरचे जादूगार एन. चंद्रकांत यांनी उपस्थित बालकांना विधिध जादूचे प्रयोग दाखवित नकलासह मनोरंजन केले. या वेळी खास सोलापूर आलेले मिकी माऊस व जोकरच्या वेषातील कलाकरांनी मुलांना खाऊ वाटप करीत आनंद दिला तीसर्‍या सत्रात उपस्थित बालकांनी आयोजकांनी उपलब्ध केलेल्या टांगा, घोडा च्या सफरीचा आनंद घेत याच ठिकाणी मोफत ठेवण्यात आलेल्यारेल्वे चक्कर, जम्पीग जॅक (गादी घर), विविध प्रकारचे चक्कर गाडी आदि खेळणी साहित्यांची मनमुराद मजा घेतली. या दरम्यान सहभागी बालंकापैकी काहीनी विशीष्ट वेशभुशेत हनुमान चाळीसा, विविध प्रकारचे नृत्य (डान्स), गायन, परी डान्स, प्रार्थना, कथाकथन, कविता वाचन, योगसने कसरती, काठी फिरवणे खेळ आदिंची कला गुण दर्शन दाखवून पालकासह आयोजकानाही भारावून सोडले. या ठिकाणच्या सभागृहात खास बाल दिना निमीत्त करण्यात आलेली विद्युत रोषणाईत बालकांनी विविध प्रकारचे मुखवटे धारण करुन लुंगी डान्ससह विविध गाण्यांच्या चालीवर सामुहिक नृत्य करित मनसोक्त आनंद लुटला. या प्रसंगी पालकांसह आयोजकदेखील बाल सामुहिक नृत्या मध्ये तालावर नाचू लागले.
     या परीसरात प्रेरणादायी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेसह बाल हनुमान, बाल गणेश, छोटा भिम, मिकी माऊस आदिचे डिजीटल फलक बालकांचचे आकर्षण ठरले. सुदृढ बालक स्पर्धतील प्रत्येक सहभागी स्पर्धकासह, विविध कला गुण दर्शना मध्ये सहभागी झालेल्‍यांना स्माईल बॉल (चेंडू), कंपास पेटी, शिट्या, मुखवटे आदि भेट वस्तू देण्यात आल्या. सदृढ बालक स्पर्धचा पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ धन्वंतरी इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे संस्थापक डॉ.द.ग.कश्यपी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर, डॉ. काका सामनगावंकर, विनय संघवी, गौतम कांकरिया, दिनेश कांकरिया, अभिजीत सोनिग्रा, प्रभावती कुंकूलोळ, संदीप सुराणा, बाळासाहेब तातेड, अमृता कुंकूलोळ आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी शाळू, कुलकर्णी, आश्‍विनी हिंगमिरे आदि पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत या बाल आनंद मेळाव्याचे कौतूक करुन आयोजकानी शिशु विकास संस्कारासाठी वारंवार असे उपक्रम राबवाव्यत अशी ही सुचविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित कुंकूलोळ यांनी केले. सूत्र संचालन प्रशांत घोडके यांनी तर आभार संतोष सुर्यंवंशी यांनी ङ्कानले. या प्रसंगी इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे मानद सचिव काका सामनगावकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उपस्थित बालकांच्या सहभागाने साजरा करणायात आला हा बाल आनंद मेळावा ( धमाल जत्रा महोत्सव ) यशस्वीतेसाठी डॉ. बाळासाहेब देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, रुपाली सूत्रे, प्रशांत बुडूख, कपिल हिंगमिरे, सागर वायकर, दिवानजी, राहूल कुंभार , उमेश देशमाने,बापू नूवरे, ताजुद्दीन सय्यद, किरण जाधव, सुशांत गिराम यांनी विशेष परिश्रम घेतले.
    सुदृढ बालक स्पर्धतील विजेते १ ते ३ वर्ष वयोगटातील प्रथम क्रङ्कांक वेंदात मंगेश सोनवणे, द्वितीय क्रङ्कांक आदि संदीप गांधी, तृतीय क्रङ्कांक शांभवी नंदकुमार देशपांडे ३ ते ५ वर्ष वयोगटातील प्रथम क्रङ्कांक अर्णव सचीन रुद्रवार, द्वितीय क्रङ्कांक सक्षम गणेश परांडकर, तृतीय क्रङ्कांक आर्यन कपिल हिंगमीरे यांना गौरविण्यात आले.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top