उस्मानाबाद :- राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अवर्षण प्रवर्षण क्षेत्रात ठाणबंद पध्दतीने शेळ्या संगोपन करण्यासाठी कळंब, भूम व परंडा तालुक्यातील लाभार्थ्यांची निवडीकरीता समिती गठीत करण्यात आली आहे.  या समितीमार्फत  कुक्कुट प्रकल्प, उस्मानाबाद येथे 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12-30 वा लाभार्थ्यांची  निवड सोडत पध्दतीने (लकी ड्रॉ व्दारे) करण्यात येणार आहे.
    या कार्यक्रमांतर्गत 50 टक्के अनुदानावर 40 शेळ्या आणि 2 बोकड असा शेळी गट वाटप करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती कार्यालयाशी  संपर्क साधावा. वरील  तालुक्यातील पशुपालकांनी उस्मानाबाद येथे वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.एस. भोसले यांनी केले आहे.
 
Top