उस्मानाबाद :- सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत  उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता, सारोळा (बु.) येथे समाधान योजनेचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अनुक्रमे बेंबळी आणि पाडोळी महसूल मंडळातील नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले तसेच विविध प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले.  
    तहसीलदार सुभाष काकडे,  नायब तहसीलदार प्रभु जाधव यांच्या अध्यक्षतेखाली याठिकाणी हे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जि.प. चे सदस्य सुधाकर गुंड, पंचायत समिती सदस्य सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
         या अभियानात विविध प्रमाणपत्राचे वाटप, निवडणूक ओळखपत्र्, वारस नोंदी, आधार कार्ड नोंदींची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.  धुत्ता येथे जमिन महसूल बेबाकी केलेल्या भागवत तनमोर यांच्या सत्कारही यावेळी  करण्यात आला. नायब तहसीलदार जाधव यांनी यावेळी या अभियानचे महत्व पटवून दिले. शेतरस्त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी शेतक-यांना केले.  प्रास्ताविक मंडळ अधिकारी डी. एच. शेख यांनी केले.
     मौ. पाडोळी व सारोळा बु. येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियानातर्गत विविध शासकीय योजनेची माहिती  देवून  विविध प्रमाणपत्राचे वितरण यावेळी तहसीलदार काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.                          
 
Top