उस्मानाबाद - जिल्ह्यात कापूस व तूर पिकावर शेंगा पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतक-यांनी कीडीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाय योजना करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
तुर पिकावरील शेंगा पोखरणा-या अळीसाठी ट्रायझेाफॉस 40 ईसी. 2 मिली किंवा क्विनॉलफॅास 25 टक्के 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोऱ्यातील तुरीसाठी निंबोळीअर्क 5 टक्के किंवा एच ए एन पी व्ही 500 मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी. मोठ्या अळया हाताने वेचून नष्ट करावीत. गुंडाळेलेली पाने वेचून ती पण नष्ट करावी. शेंगा पोखरणा-या अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावून तसेच पक्षी थांबे प्रती हेक्टरी 50 उभारावेत.
तूरीच्या यजमान वनस्पती नष्ट करुन किटक नाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी किटक नाशकाची मात्रा 3 पट करावी, असेही आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.