बार्शी : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणार्या ५३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील १९ केंद्रावर दि. १९ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेच्या सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक फेरीसाठी १५ संघांनी सहभाग घेत नावे नोंदविली आहेत. बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन नाट्यगृह या केंद्रात दि. १९ ते ३० पर्यंत स्पर्धेची प्राथमिक फेरी होत आहे. याचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांच्या हस्ते होत असल्याची माहिती स्पर्धा समन्वयक रामचंद्र इकारे यांनी दिली.
बार्शी केंद्रात दि. १९ नोव्हेंबरपासून बार्शी केंद्रातील पहिल्या फेरीत सादर होणारे नाट्य स्पर्धेतील सहभागी नाटय संस्था, नाटके पुढीलप्रमाणे : दि. १९ नोव्हेंबर रोजी समराधना सोलापूर या नाट्यसंस्थेचे डॉ. समीर मोने लिखित द इंटरप्रिटर, दि. २० रोजी श्रृतीमंदिर सोलापूर या नाट्यसंस्थेचे विद्या काळे लिखित थोड फार सारखंच, दि. २१ रोजी श्री बनशंकरी बहुउद्देशीय संस्था सोलापूर या नाट्यसंस्थेचे डॉ.संजीव शिंदे लिखीत एम आय वन वन सेव्हन्टी वन, दि. २२ रोजी सुस्नेह सांस्कृतिक मंडळ या नाट्यसंस्थेचे रविशंकर झिंगटे लिखित दुसरा अंक, दि. २३ रोजी स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ, थोरले मानेगाव (ता. माढा) या नाट्यसंस्थेचे सरदार पाशा पिरजादे व श्रीधर गोखले लिखीत 'कन्या नव्हे ती आपली', दि. २३ रोजी वसंतराव नाईक विद्या विकास संस्था गंधोरा (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) या नाट्यसंस्थेचे अभय राठोड लिखीत 'एक नार गाव बेजार', दि.२४ रोजी ओंकार बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचलित ओंकार नाट्य मंदिर, सोलापूर या नाट्यसंस्थेचे विजय कटके लिखीत 'दुभंगून जाता जाता', दि. २४ रोजी नटराज शिक्षण प्रसारक मंडळ, शाहू नगर उस्मानाबाद या नाट्यसंस्थेचे रामचंद्र गुरव लिखीत 'छक्के पंजे', दि.२५ रोजी निपॉन सोशल वेलफेअर सोसायटी संचलित धर्मवीर राजे क्रीडा मंडळ गंधोरा (ता. तुळजापूर) या नाट्यसंस्थेचे ए.जी.राठोड लिखीत नवीन दिशा, दि. २६ रोजी आनंदयात्री प्रतिष्ठान, बार्शी या नाट्यसंस्थेचे यतिन शि. माझिरे लिखीत आतापास, दि. २७ रोजी ललित कला मंदिर, सोलापूर या नाट्यसंस्थेचे योगेश सोमण लिखित फिडम फायटर, दि. २८ रोजी धर्मवीर संभाजीराजे भोसले सामाजिक संस्था जय शिवाजी लोकनाट्य मंडळ, उस्मानाबाद या नाट्यसंस्थेचे उध्वस्त, दि. २९ रोजी भारतीय क्रीडा शिक्षण नाट्य मंडळ, सोलापूर या नाट्यसंस्थेचे शमाज्ञअत खान लिखीत राहिले दूर घर माझे, दि. ३० रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर या नाट्यसंस्थेचे आनंद खरवस लिखीत परीघ, दि. ३० रोजी आराधना विश्वस्त मंडळ, सोलापूर या नाट्यसंस्थेचे विजय कुलकर्णी लिखीत गोल खुनाची,
या स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी बाळासाहेब कोरके, सौ.वर्षा ठोंबरे, रवि कापसे, नागेश अक्कलकोटे, प्रा. मधुकर फरताडे, प्रा. शिवपुत्र धुत्तरगांव, प्रा. दिपक गुंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा यशस्वितेसाठी समन्वयक रामचंद्र इकारे, सह समन्वयक प्रताप दराडे, अभिजीत मनगिरे, गणेश अक्कलकोटे, प्रविण भडके, हर्षद लोहार, कृष्णा उपळकर, रुपेश बंगाळे, मकसूद मुल्ला आदी परिश्रम घेत आहेत.
(मल्लिकार्जून धारुरकर)