सोलापूर :- पुणे विभागाच्या महसुल क्रीडा स्पर्धा 2013 चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते पार्क स्टेडियम येथे झाले. यावेळी महसुल उपायुक्त तुकाराम पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      विभागीय 5 जिल्ह्यातील संघामध्ये दिनांक 26 व 27 नोव्हेंबर रोजी क्रिकेट स्पर्धा, 28 नोव्हेंबर रोजी बॅडमिंटन स्पर्धा तर दिनांक 29 पासून 1 डिसेंबर पर्यंत इतर विविध क्रीडा प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. दिनांक 1 डिसेंबर रोजी सायंकाळी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.


 
Top