सोलापूर :- घटनेचे व कायद्याचे पालन करणे हीच खरी घटनाकारांना श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. गेडाम म्हणाले की, भारताच्या इतिहासात संविधान दिन हा महत्वाचा दिवस आहे असे सांगून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहका-यांना यानिमित्त अभिवादन केले. तसेच सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त स्व. अशोक कामटे व अन्य शहिद हुतात्म्यांनाही डॉ. गेडाम यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
यानिमित्त संविधानाचे जाहिर वाचनही करण्यात आले. याप्रसंगी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दिपक घाटे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.