पांगरी (गणेश गोडसे) : सोलापुर जिल्हयात द्राक्ष उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या व गत अणेक वर्षांपासुन दुष्काळाचे चटके सोसुन परिस्थतीला कसेतरी तोंड देत असलेल्या पांगरी-कारी (ता.बार्शी) परिसरातील द्राक्ष ऊत्पादक शेतकरी घड माल बाहेर पडत नसल्यामुळे मोठया गंभिर विवंचनेत सापडलेला असुन द्राक्ष बागांयतदार शेतक-यांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढे काय करायचे हा मोठा यक्ष प्रश्न सध्या या भागातील शेतक-यांच्या समोर उभा राहीलेला आहे. द्राक्ष ऊत्पादकांमधुन घबराटीचे वतावरण पसरलेले आहे. बागा ठेवायच्या का त्या तोंडायच्या या विचारापर्यंत ते विचार करू लागले असुन कांही शेतक-यांनी तर अनेक वर्षे व गत दुष्काळातही सांभाळलेल्या बागा सध्या कांहीही विचार न करता सरळ तोडण्यास सुरूवात केली आहे. बागा तोडल्या काय आणि सांभाळल्या काय दोन्हीकडुन नुकसान हे त्या द्राक्ष उत्पादक शेतक-यांचेच होणार आहे.
एप्रिल महिन्यात खरड छाटनी केली तरच फळधारणा होऊन चांगल्या प्रकारे माल बाहेर पडतो असे जानकारांकडुन बोलले जाते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात पाण्याच्या असलेल्या भिषण टंचाईमुळे या भागातील शेतक-यांना पाऊस सुरू झाल्यानंतर जुनमध्ये छाटनी घ्यावी लागली. जुन, जुलै, ऑगस्ट या ती महिन्यांच्या कालावधी दरम्यान झाडांना मुबलक प्रमाणात सुर्यप्रकाश मिळु शकला नाही. परिणामी झाडांना अन्नद्रव्य मिळु शकले नाही व फांदयांच्या पाणांची व घडांचीही वाढ होऊ शकली नाही. साधारणतः या भागातील बहुतांश बागा हया जुनमध्येच छाटल्या गेलेल्या असल्यामुळे साधारणतः 80 टक्के बागांचे घड बाहेर पडले नसल्याचा प्रथमिक अंदाज आहे.
ऑक्टोंबर महिन्यात शेतक-यांच्या सोईने ते द्राक्षबागांची छाटनी करून घेतात.ऑक्टोंबर महिन्यात छाटनी केल्यानंतर साधारणतः 12 ते 15 दिवसात घड बाहेर पडुन माल दिसु लागतो. मात्र महिन्याचा कालावधी उलटुन जावुनही घड दिसत नसल्यामुळे शेतक-यांनी सहा महिन्यांपासुन बागेसाठी केलेले कष्ट व एकरी पंचेवीस हजार रूपयांचे आर्थिक नुकसान त्यांना सोसावे लागणार आहे. आधिच तिन वर्षांपासुन पैश्यासाठी कंगाल झालेल्या शेतक-यांना बागांनी पुन्हा एकदा नागावले आहे. गतवर्षी अनेक शेतक-यांनी हजारो रूपये खर्च करूण मलचिंग पेपर टाकुन आर्थिक हानी सोसुन बागा जगवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एवढे करूनही द्राक्षबागांना माल लागला नसल्याचे उघड झाल्यामुळे ऊत्पादकांमधुन भिती युक्त वातावरण पसरलेले आहे. आता केलेल्या खर्चाचे काय तो परत कसा फेडायचा पुन्हा या बागा वर्षभर जगवायच्या त्यांची निगा राखायची पुन्हा पुढच्या वर्षी खर्च करायचा या एक ना अणेक प्रश्नांनी सध्या शेतक-याला भंडाळुन सोडलेले आहे. यातुन मार्ग कसा निघणार, हा विषय रामभरोसे सोडुन शेतकरी इतर कामात लक्ष घालण्याच्या विचारात आहेत.