नळदुर्ग : दिवसेंदिवस शहरात अवैध धंदे वाढत चालले असून येत्‍या आठ दिवसात पोलिसांनी अवैध धंद्याना आळा नाही घातला तर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना नळदुर्ग शहर शाखेच्‍यावतीने पोलीस ठाण्‍यासमोर साखळी उपोषण आंदोलन करण्‍याचा इशारा मनसेच्‍यावतीने नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे पोलीस उपनिरीक्षक यांना देण्‍यात आले आहे.
    गेल्‍या काही दिवसापासून नळदुर्ग शहरामध्‍ये अवैध धंद्यांना मोठ्याप्रमाणावर ऊत आले आहे. हातभट्टी दारु, मटका, गुटखा असे बेकायदा धंदे खुलेआम चालू आहे. या अवैध धंद्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्‍यामुळे मोठ्याप्रमाणावर अवैध धंद्यात वाढ होत आहे. मटका हा प्रकार शाळकरी मुलांमध्‍ये खुप प्रसिध्‍द झाला आहे. शाळेला जाणारी मुले जर मटका खेळत बसली तर समाजाच्‍या दृष्‍टीने ते खूप घातक आहे. नळदुर्ग शहरातील वसंतनगर, अक्‍कलकोट रोड यासह इतर ठिकाणी हातभट्टी दारु, मटका लावणे अश्‍या धंद्याना ऊत आलेला आहे. अवैध धंद्याना आळा नाही घातला तर गोरगरीब जनतेचे संसाद उध्‍दवस्‍त होईल. तरी अवैध धंदे बंद करावे, अन्‍यथा मनसेच्‍यावतीने साखर उपोषण करण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे. या निवेदनावर मनसेचे शहराध्‍यक्ष जोतिबा येडगे, शहर उपाध्‍यक्ष शिवाजी चव्‍हाण, अलिम शेख, रमेश घोडके, अरुण जाधव, गौस कुरेशी, दत्‍तात्रय धारवाडकर, रमेश झुंबर अंधारे, कुरेशी वसीम, शिरीष डुकरे आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. याची एक प्रत माहितीस्‍तव राज्‍याचे गृहमंत्री, उस्‍मानाबाद जिल्‍हा पोलीस अधिक्षक, जिल्‍हाधिकारी आदींना पाठविण्‍यात आले आहे.
 
Top