नाम तुझे घेता आण्‍णा
विडबंन काव्‍य

नाम तुझे घेता अण्‍णा मिले मतदान
तुझामुळे लाभो मझ सत्‍ता पद धन
नाम तुझे घेता अण्‍णा मिले मतदान.....

सुत्रधार आम आदमीचा करी अनशन
कालगतीने फिरवीशी राजकीय ध्‍यान
मिळो खुर्ची तुझ्या नामे  ढेशी ऐसे दानं
नाम तुझे घेता अण्‍णा मिले मतदान.....

खुर्ची सत्‍ता माया भुलवी मन धाव घेई
भ्रष्‍ट घोटाळ्यांचे फेरे दिसे ठायी ठायी
आहे तुच अंतरज्ञानी तुझं सर्व जान
नाम तुझे घेता अण्‍णा मिले मतदान....

निवडणुकीत लागो आम्‍हा आस दर्शनाची
परी तुझ्या कोंडयाळयांची भाषा अडवण्‍याची
कुठे दिल्‍ली आणि आण्‍णा कुठे राळेगणं
नाम तुझे घेता अण्‍णा मिले मतदान...

अल्‍प बुध्‍दी माझी अण्‍णा भक्‍त मी रे आम
दिल्‍लीमध्‍ये सा-यांना मी फोडला आहे घाम
भेटीसाठी अण्‍णा मीही करु का  अनशन
नाम तुझे घेता अण्‍णा मिले मतदान...
तुझ्यामुळे लाभो मज सत्‍ता पद धन 

- भगवंत सुरवसे
    

 
Top