उमरगा –: अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उमरगा तालुकाध्यक्ष ह.भ.प. शरदचंद्र माधवराव बिराजदार महाराजाच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील  ह.भ.प. गुरूवर्य धोंडोपंत दादासाहेब संस्थानात अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार दि. 3 डिसेंबर ते मंगळवार दि. 10 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
   उमरगा तालुक्यातील जकेकूर येथील ह.भ.प. शरदचंद्र महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील धोंडोपंत दादाच्या मठात काकडा, गाथाभजन, हरिपाठ, पांडुरंग दर्शन, किर्तन, हरिगाजर आदी धार्मिक कार्यक्रमाद्वारे संपन्न होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी ह.भ.प. एकनाथ दिवाणजी पिंपळनेकर पंढरपूर यांचे किर्तन, बुधवार दि. 4 रोजी ह.भ.प. नामदेव मंदीर संस्थान पंढरपूर यांचे किर्तन, गुरूवार दि.5 रोजी ह.भ.प. गुरूवर्य धोंडोपंत दादासाहेब संस्थान पंढरपूर यांचे किर्तन,शंक्रवार दि. 6 रोजी  ह.भ.प. शरदचंद्र बिराजदार महाराज जकेकूरकर यांचे किर्तन, शनिवार दि.7 रोजी ह.भ.प. प्रसाद महाराज बडवे पंढरपूर यांचे किर्तन, रविवार दि. 8 रोजी ह.भ.प. आंबादास महाराज लखनगावकर यांचे किर्तन, सोमवार दि. 9 रोजी ह.भ.प. बाबू महाराज लोनीकर यांचे किर्तन, मंगळवार दि. 10 रोजी ह.भ.प. माधव महाराज जकेकूर विश्वस्थ यांचे काल्याचे किर्तनाने व श्रीमती मंजूळाबाई हरिबा वडरगे तुगावकर यांचे महाप्रसाद वाटपाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
    या महोत्सवास उस्मानाबादचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, पंढरपूरचे माजी आ. सुधाकरपंत परिचारक, औसाचे आ. बसवराज पाटील, दक्षिण सोलापूरचे आ. दिलीप माने, माजी आ. रविंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, उमरग्‍याचे आ. ज्ञानराज चौगुले, शिवशक्ती साखर कारखान्याचे संचालक डॉ. अभयराजे चालुक्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सप्ताहात लातूर, उस्मानाबाद, बिदर, गुलबर्गा, सोलापूर, पूणे जिल्हातील सर्व भाविक भक्त तसेच जयहिंद हरिबा वडरगे, सुनिल जगताप, गुणवंत वडरगे, दिलीप वडरगे आदी भक्तगण मोठया संख्येनी सहभागी होवुन महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  
(लक्ष्‍मण पवार)
 
Top