सोलापूर :- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत मौजे चिक्केहळ्ळी (ता. अक्कलकोट) येथील खरेदी करण्यात आलेली गट क्र. 253 मधील 25 गुंठे जमिनीपैकी 12 एकर जमिन आणि मौजे जाम खुर्द (ता. मोहोळ) येथील खरेदी करण्यात आलेली गट क्र. 70/2 मधील 11 एकर 12 गुंठे जमिनीपैकी 9 एकर 2 गुंठे जमिन अनुसुचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील शेतमजुरांना वाटप करण्यात आली आहे.
    मौजे चिक्केहळ्ळी ता. अक्कलकोट येथील गट क्र. 253 मधील उर्वरित शिल्लक जमिन 13 एकर 25 गुंठे जमिन आणि मौजे जामगांव खुर्द ता. मोहोळ येथील गट क्र. 70/2 मधील उर्वरित शिल्लक 2 एकर 10 गुंठे जमिन मागणी करण्याबाबत दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती नव बौध्द घटकातील लोकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
    अर्जदार हा अनुसुचित जातीमधील दारिद्रय रेषेखालील भुमिहीन शेतमजुर असावा, अर्जासोबत वयाबाबत पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला), सनद तलाठ्याचा दाखला, अनु.जाती नवबौध्द असल्याबाबत तहसिलदार/ उपविभागीय अधिकारी यांच्या सहीचा जातीचा दाखला, रहिवासी दाखला, भुमिहीन शेतमजुर असलेबाबत तहसिलदार यांचा दाखला/महसुल/वन विभागाकडून जमिन मिळाले नसलेबाबत तलाठी यांचा दाखला, स्वत:चज्ञ फोटो, दारिद्रय रेषेचा कार्ड व दारिद्रय यादीमधील क्रमांक, रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर जमिन हस्तांतरीत करणार नसलेबाबत व स्वत: करणार असलेबाबत यापूर्वी जमिन मिळाले नसलेबाबत सदरची जमिन स्वत: असल्याबाबत आणि भुमिहीन असलेबाबत रु. 20 किंवा रु. 50 च्या प्रतिज्ञा पत्रावर हमी पत्र सादर करावे.
    जमिन मागणी करणा-या अर्जदारांनी कार्यालयीन वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अर्ज करावेत असे सहायक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे. 
 
Top