उस्मानाबाद :- येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट जनजागृती अभियान कार्यक्रमाची लोकप्रतिनिधीना माहिती व्हावी, यासाठी  सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली.
    प्रास्ताविकात प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी एकात्मिक पाणलोट व्यस्थापन कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधी/ झालेला खर्च / प्रत्यक्ष निधी व पुढील कालावधीत नियोजीत कामाबाबत सादरीकरणाव्दारे उपस्थित मान्यवराना माहिती  देवून  एकात्मिक  पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंमलबजावणी कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सर्वांनी योगदान देण्याचे  आवाहन केले.
     उपविभागीय कृषी अधिकारी बिराजदार यु. पी. यांनी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत प्रकल्पाची निवड, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा व पाणलोट समिती स्तरावरील रचना व कार्यपध्दती, प्रकल्पांच्या पुर्वतयारीचा टप्पा,  प्रत्यक्ष कामे व बर्हिगमन टप्पा, प्रकल्पामुळे प्रकल्प क्षेत्रातील गावांना मिळणारे फायदे यांची सविस्तर माहिती दिली.
     शेवटी जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. मिणीयार यांनी आभार मानले. सदरील अभियान  6 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
 
Top