उस्मानाबाद :- जागतिक एडस दिनानिमित्त जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने एडस जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीस प्रभारी जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. 
    यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी, वैद्यकिय अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी  गणेश काकडे, जिल्हा रुगणालयातील सर्व वै्‌द्यकिय अधिकारी  व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        या रॅलीत शहरातील महाविद्यालयातील प्राचार्य, प्राधयापक, अकराशेहून  विद्यार्थी, विद्यार्थींनी, रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ही रॅली सकाळी जिल्हा रुग्णालय-काळामारुती चौक-नेहरु चौक, देशपांडे स्टॅन्ड-शिवाजी चौक मार्गे  निघून रॅलीचा समारोप पुन्हा  जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. या  रॅली आयोजनासाठी पोलीस अधिक्षक, नगर परिषद, शहर पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखा आणि शहरातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
      ही  रॅली यशस्वीतेसाठी अमोल व्हट्टे, शितोळे, पाटील, कारले, निकम, खांडवे, बचाटे, खुने, मुंडे, रोडगे, तिगाडे, श्रीमती कांबळे, नवले, कुंभार आदिनी परिश्रम घेतले.
        या रॅलीत के. टी. पाटील फार्मसी कॉलेज, के.टी पाटील नर्सींग कॉलेज, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक (मुलांची) शाळा, जिल्हा परिषद (कन्या) शाळा, आर. पी. अध्यापक विद्यालय, आर. पी. महाविद्यालय, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज,आर्य चाणक्य विद्यालय, शरद पवार उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी  आणि विद्यार्थींनी सहभाग घेतला होता.   
 
Top