नळदुर्ग -: राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या सांस्कृतिक विभागाच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी नळदुर्ग येथील कलावंत गायक अंबादास उर्फ निलेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष डी.एन. कोळी यानी सदर निवडीचे पत्र अंबादास वाघमारे यांना दिले असून त्यात म्हटले आहे की, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व सांस्कृतिक कार्य विभाग प्रदेशाध्यक्ष विकास पाटील यांच्या मान्यतेनुसार आपण सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन वाघमारे यांची सांस्कृतिक विभागाच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तुळजापूर तालुक्यातील सर्व कलावंतानी व मित्र परिवारानी त्यांचे अभिनंदन केले आहे.