उस्मानाबाद :- माजी सैनिक (मुलांचे) वसतीगृह, उस्मानाबाद येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात चौकीदार पद भरण्यात येणार असून या पदासाठी दरमहा 7 हजार 245 रुपये मानधन देण्यात येणार असून ही सेवा पुर्णवेळ राहील. इच्छुक माजी सैनिकांनी आपल्या सर्व मुळ कागदपत्रासह 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) एस. बी. सासणे यांनी केले आहे.