उस्मानाबाद :- शिक्षण विभागाच्यावतीने मंगळवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त प्रभातफेरी काढून संविधानदिनाचा प्रचार- प्रसार  करण्यासाठी शहरातील विविध शाळेतील इ. 8 वी,इ. 9 वी व इ. 10 वीच्या विद्यार्थी जिल्हा परिषद (कन्या) प्रशालेच्या प्रांगणात  सकाळी 9-30 वाजता संविधानाचे सामुहिक वाचन करणार आहेत,असे  जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचे शिक्षणाधिकारी वैजनाथ खांडके यांनी कळविले  आहे.    
 
Top