बार्शी : त्रिपुरा पोर्णिमेनिमित्त भगवंत मंदिर येथे बार्शी फिल्‍म मेकर्स, रोटरॅ्नट क्‍लब ऑफ  बार्शी एव्हरग्रीन व आम्ही बार्शीकर एक परिवार च्‍यावतीने दिपोत्सव आणि फोटोग्राफी स्पर्धा पार पडल्या.
     या स्पर्धेत प्रोफेशनल फोटोग्राफर, आर्टिस्ट, हौशी अशा ७० स्पर्धेकांनी यात सहभाग नोंदवला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्‍या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम सोमनाथ शिवशेट्टी, द्वितीय गणेश दास, तृतीय सुष्मित बागल, चतुर्थ आशिष राऊत, विशेष अखिल देशमुख, प्रथम तीन पारितोषकांना रोख रक्कम, सन्‍मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्‍यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व प्रसिध्द उद्योगपती विनयभाई संघवी यांनी तरूणांचे कौतुक केले. युवकांनी या क्षेत्रातील संधीचा फायदा घेण्‍याचे सांगितले. पो.नि. सालार चाऊस यांनी देखील या उपक्रमाबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमास  विनङ्मभाई संघवी, रोटरॅ्नट क्‍ललबचे अध्‍यक्ष संदीप कदम तसेच परिक्षक म्हणून लाभलेले रामचंद्र इकारे, धीरज पाटील, आनंद बेदमुथा, इम्रान आतार, प्रशांत क्षिरसागर, सोमनाथ जाधव यांच्‍यासह मान्यवर उपस्थित होते.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top