बार्शी :- संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक शिवसेना प्रमुखांच्या प्रथम स्मृतीदिनास शिवतिर्थावर उपस्थित होता. बार्शीतील शिवसैनिकदेखिल हजारोंच्या संख्येने यावेळी हजर होते. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे यांनी पक्षाच्या शिस्तीचे अनुपालन करत शिवसैनिकांसमवेत अतिशय शांततेत शिवसैनिकांच्या सोबत दर्शन घेतले.
दि. १६ नोव्हेंबर रोजी बार्शीहून शिवसैनिकांचा ताफा रवाना झाला होता. सकाळी मुंबईत पोहोचताच शिस्तबध्द रांगेतून शिवतिर्थाकडे रवाना झाले. शिवसैनिकांच्या हातामध्ये यावेळी आपल्या हृदयस्थानात विराजमान झालेल्या शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र होते. गळ्यात भगव्या पट्ट्या तर डोक्यावर भगवी टोपी होती. आदर्श आचार संहितेचे पालन करत शिवसेना प्रमुखांच्या स्मृतींना अभिवादन करुन भावपूर्ण अंतकरणाने शिवसैनिकांनी शिवतिर्थावर उभारलेल्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण केले.
आपल्या श्रध्दास्थानावरील नितांत आदरभाव व्यक्त करत निष्ठेचे प्रदर्शन घडवत हे शिवसैनिक बार्शीला परतले. शिवतीर्थावर गेलेल्या हाजारो शिवसैनिकांच्या समवेत आदरांजलीच्या या सुयोगामुळे शिवसेना प्रमुखांच्या विचारांवरची निष्ठा अधिक दृढ झाल्याचे राजेंद्र मिरगणे यांनी मुंबईहून परतल्यावर व्यक्त केले.

(मल्लिकार्जून धारुरकर)