नळदुर्ग -: हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्‍या प्रथम स्‍मृतीदिनानिमित्‍त नळदुर्ग नगरपरिषद कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा न.प. कार्यालयास भेट देण्‍यात आले.
    न.प. मुख्‍याधिकारी त्र्यंबक पाटील यांच्‍या हस्‍ते प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. तर नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार यांच्‍या हस्‍ते श्रीफळ फोडण्‍यात आले. यावेळी नगरसेवक तथा शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख कमलाकर चव्‍हाण, नय्यर जहागिरदार, दयानंद बनसोडे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, शिवसेनचे युवासेना तालुकाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर घोडके, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, शाम कनकधर, खय्युम कुरेशी, शिवाजी धुमाळ, गजानन कुलकर्णी, सुर्यकांत घोडके यांच्‍यासह शिवसैनिक, नागरीक व न.प. कर्मचारी उपस्थित होते.
 
Top