उस्मानाबाद -: ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याचे दोन टँकर, ट्रक, ट्रॅक्टर, कार, जीप असे मिळुन सहा वाहने कारखान्यातुन जप्ती करण्यात आली , या कारखान्याला व्यापार्याने पुरविलेल्या साहित्याची रक्कम न दिल्यामुळे उस्मानाबाद न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई सोलापूर येथील व्यापारी व न्यायालयाच्या कर्मचार्यांनी सोमवारी रोजी केली.
सोलापूर येथील प्रवीण एन्टरप्रायझेस या फर्ममार्फत कारखान्याला लागणार्या मशिनरी व टुलचा पुरवठा केला जातो. कारखान्यात 2000 ते 2004 च्या दरम्यान प्रवीण एन्टरप्रायझेसकडून 21 लाख 93 हजार रुपयांच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता. पुरविलेल्या साहित्यापोटी सातत्याने रकमेची मागणी करूनही कारखाना प्रशासनाकडून रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. यामुळे फर्मच्या वतीने राजेश मुंदडा यांनी उस्मानाबाद येथील दिवाणी न्यायालयात रकमेच्या वसुलीचा दावा दाखल केला. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश पी. बी. मोरे यांनी 16 फेब्रुवारीला तेरणा कारखान्याच्या मालकीची आठ वाहने जप्त करून प्रवीण एन्टरप्रायझेसचे देणे द्यावे, असा आदेश दिला. न्यायालयाचा आदेश घेऊन बेलिफ बी. बी. कुचेकर, व्यापारी राजेश मुंदडा तेरणा कारखान्यावर सोमवारी (दि.18) पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले. यावेळी तेरणा कारखान्याच्या वतीने डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर व कार्यकारी संचालक बी. पी. आढाव यांनी कुचेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वाहन जप्तीची कारवाई सुरू झाली. यावेळी पोलिस पाटील राहुल वाकुरे व कामगार बहुसंख्येने उपस्थित होते . सावंत बंधूंच्या मदतीने आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कारखाना कसाबसा सुरू केला. मात्र, अद्यापही कारखान्याच्या समस्यांचा ससेमिरा संपण्यास तयार नाही. कामगारांच्या दीर्घकालीन संपामुळे कारखाना बंद राहिला. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली. तसेच शेतकर्यांचेही नुकसान झाले. कारखान्याच्या जमीन जप्तीचीही कारवाई झाली. आता वाहनांच्याही जप्तीच्या कारवाईला तोंड देण्याची वेळ आली आहे.
मुदतीची मागणी फेटाळली
यावेळी कारखान्याच्या वतीने डॉ. राजेनिंबाळकर यांनी रक्कम देण्यास तीन महिन्यांची मुदत मागितली. या संदर्भात सुमारे एक तास चर्चा करण्यात आली. तीन महिन्यांत रक्कम देण्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक आढाव यांनीही कबूल केले. मात्र, कर्मचारी व व्यापार्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. मुदत देण्याची बाब न्यायालयाच्या कक्षेतील असल्याचे सांगून कारवाई करण्यात आली.

क्रेनच्या साहाय्याने वाहने न्यायालयात
क्रेनच्या साहाय्याने कारखान्याच्या मालकीचे दोन टँकर, ट्रक, ट्रॅक्टर, कार, जीप अशी सहा वाहने कारखान्यातून नेण्यात आली. सर्व वाहने उस्मानाबाद येथील न्यायालयाच्या आवारात लावण्यात आली .
जुन्या देण्यापोटी कारवाई
जुन्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात ही खरेदी झाली होती. आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या ताब्यात कारखाना आल्यावर सर्व देणी फेडण्यात येत आहेत. या कावाईच्या विरोधात वरच्या न्यायालयात अपिल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. .'' रमाकांत टेकाळे, उपाध्यक्ष, तेरणा कारखाना.
पुरविलेल्या साहित्याच्या बिलाकरता गेल्या दहा वर्षांपासून वारंवार मागणी करूनही कारखाना प्रशासनाने बिल देण्यास टाळाटाळ केली. म्हणून न्यायालयात जाण्याचा पर्याय स्वीकारावा लागला. '' राजेश मुंदडा, व्यापारी, प्रवीण एन्टरप्रायझेस, सोलापूर. च्या आवारात लावण्यात आली आहेत.

साभार - दिव्य मराठी