उस्मानाबाद : विषेश घटक योजनेअंतर्गत खोदलेल्या विहरीची सातबारा रेकॉर्डला नोंद करण्यासाठी ५०० रुपयाची लाच घेणा-या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचा-यांनी जेरबंद केले आहे.
मेंढा (ता. उस्मानाबाद)ये थील संजय पांडुरंग भिसे यांनी सन २०११ मध्ये पंचायत समिती यांच्याकडुन विषेश घटक योजने अंतर्गत आपल्या शेतामध्ये विहीर खोदुन घेतली होती. या विहरीची नोंद घेण्याचा फेरफार त्यांनी मंजुर करुन घेवुन याची नोंद सातबारा रेकॉर्डला घेण्यासाठी दि. 18 नोव्हेंबर रोजी संजय भिषे यांचे वडील पांडुरंग चोखा भिसे यांनी तलाठी कुदळे यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन अर्ज केला होता. सदरील अर्ज आल्यानंतर तलाठी कुदळे यांनी संजय भिसे यांच्याकडे ५०० रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत भिषे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचुन तलाठी हणुमंत सिध्दप्पा कुदळे यांना भिषे यांच्याकडुन ५०० रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडुन अटक केली.
ही कामगीरी पोलीस उपअधिक्षक नईम हाश्मी, व त्यांचे सहकारी पोनि. एफ. सी राठोड पोकॉ व्ही. बी सिद, पोकॉ दिलीप भगत, पोना नितीन सुरवसे, पोकॉ नितीन तुपे, पोकॉ बालाजी तोडकर यांनी केली.