लोहारा : एका तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या घटना तावशीगड (ता. लोहारा) येथे सोमवार दि. 18 नोव्‍हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्‍याच्‍या दरम्‍यान घडली. याप्रकरणी लोहारा पोलिसात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली आहे.
    अर्जुन काशिनाथ चव्हाण (वय 30 वर्षे, रा. तावशीगड, ता. लोहारा) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव आहे. यातील अर्जुन याला दारू प्यायची सवय होती. त्याने सोमवारी दारून पिऊन नशेमध्ये तावशीगड शिवारातील गणपत घोडके यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ मारुती चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
 
Top