उस्मानाबाद - समुद्रवाणी व कामेगाव (ता.उस्मानाबाद) येथून जवळच असलेल्या तेरणाकाठी (पांढरी) येथे गणेशनाथ महाराज यात्रेनिमित्त २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    मागील १३ वर्षापासून गणेशानाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त तेरणा नदीकाठी त्यांच्या मंदीर ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यानुसार २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या दरम्यान दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. तर २ डिसेंबर रोजी भव्य यात्रा महोत्सव व जंगी कुस्ती कार्यक्रम होणार आहे. तसेच या सप्ताहात नवनाथ महाराज सकनेवाडी, वैजिनाथ महाराज गंगाखेडकर, मुकुंद देवगिरे महाराज सारोळा (बु.), सुधाकर साळुंके (बोरखेडा), अनिल पतंगे (कामेगाव), मुळे महाराज जुनोनीकर, तर काल्याचे कीर्तन योगेश इंगळे (दारफळकर) यांचे होणार आहे.
    तरी या कार्यक्रमाचा परिसरातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कामेगाव, समुद्रवाणी ग्रामस्थ तसेच गणेशनाथ सेवा मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Top