नळदुर्ग -: एका शालेय विद्यार्थिनीस शिष्‍यवृत्‍तीधारक होऊनही गेल्‍या तीन वर्षापासून शिष्‍यवृत्‍तीचा लाभ मिळाला नाही. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभार चव्‍हाटयावर आला आहे.
    नळदुर्ग येथील जिल्‍हा परिषद कन्‍या प्राथमिक शाळेत सन 2009-10 या शैक्षणिक वर्षात कु. रोहिणी शहाजी येडगे इयत्‍ता चौथीमध्‍ये शिकत होती. त्‍यास फेब्रुवारी 2010 मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या पूर्व माध्‍यमिक शालेय शिष्‍यवृत्‍ती परीक्षेत धारक झालेली आहे. तिला शिष्‍यवृत्‍ती मिळणे आवश्‍यक होते. मात्र शिक्षण क्षेत्रातील भोंगळ कारभारामुळे येडगे यास शिष्‍यवृत्‍तीचा लाभ मिळाला नाही. तिचे राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते आहे. याप्रकरणी वरील शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकानी पंचायत समिती तुळजापूरचे गटशिक्षणाधिकारी यांच्‍याकडे दि. 28 जून 2013 रोजी रोहिणी हिला शिष्‍यवृत्‍ती मिळवून द्यावी, याबाबत लेखी कळविले होते. मात्र अद्यापपर्यंत शिष्‍यवृत्‍ती मिळाली नाही. याप्रकरणी चौकशी करुन शिष्‍यवृत्‍तीपासून वंचित ठेवणा-यांविरूद्ध कारवाई करावी व शिष्‍यवृत्‍ती तात्‍काळ मिळवून देण्‍याची मागणी होत आहे.
 
Top