नळदुर्ग -: येथील लोकमान्य वाचनालयात हक्काचे घरकूल मिळण्यासाठी झालेल्‍या लाभार्थ्‍यांच्‍या बैठकीत  दि. 2 डिसेंबर रोजी नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार करण्‍यात आला.
          नळदुर्ग येथील लोकमान्य वाचनालयात हक्काचे घरकुल गत 6 वर्षापासून मिळत नसल्याने याबाबत लाभार्थ्याची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या बैठकीत पुढील अंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्वांनी आपापली मते निर्भिडपणे मांडली. यावेळी अनेक महिलांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केल्‍या. या बैठकीत येत्या दि. 2 डिसेंबर पर्यंत नगर पालिकेने बांधलेली 302 घरे दुरूस्त करून लाभार्थ्यांना त्‍वरीत हस्तांतरीत करावे व उर्वरीत घरकुलांचे बांधकाम त्वरीत चालू करावे. अन्यथा 2 डिसेंबर रोजी नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्‍यात आला.
        या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते सुशांत भुमकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप कुलकर्णी, नगरसेवक अमृत पुदाले, पद्माकर घोडके, संगीता गायकवाड, जिलानी शेख, हबीब पठाण, लाडले साब बागवान, सय्य्द अमीर, मैनोद्दीन अत्ताफ शेख, नबीलाल पल्लीवाले, चाँदसाब शेख, रेहाना गुजावर, निजाम कुरेशी, सुदाम कांबळे, धोंडीराम थोरात, निसार शेख, मुक्तार शेख, रसुलबी शेख, अभिनाबी शेख, रशीद फकीर, यांच्यासह असंख्य लाभार्थी उपस्थित होते.  
 
Top