नळदुर्ग -: येथील जय भवानी चौकात हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्‍या प्रथम स्‍मृतीदिनानिमित्‍त अभिवादन करण्‍यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, युवा सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके, मुस्‍लीम क्रांती सेनेचे शहराध्‍यक्ष खुय्यम कुरेशी, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहरप्रमुख बबलु डुकरे, भाजपाचे माजी शहरप्रमुख तथा श्री स्‍वामी समर्थ अर्बन बँकेचे चेअरमन धिमाजी घुगे, व्‍हा. चेअरमन गोपाळ देशपांडे, सुशांत भूमकर, मनोज मिश्रा, अमित शेंडगे, शनी भूमकर, कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी, अॅड. अरविंद बेडगे, मल्लिकार्जून गायकवाड आदीजण उपस्थित होते. यावेळी अनेकांनी बाळासाहेब ठाकरेंच्‍या आठवणींना उजाळा दिला.
 
Top